वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या वतीने रविवारी जालन्यात भव्य रक्तदान शिबीरात ५६ जनांनी केले रक्तदान
भोकरदन मधुकर सहाने
:न्युज जालना
सध्या कोरोनामुळे राज्यात व पूर्ण देशात रक्ताची खुप कमतरता जाणवत आहे.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जालना तर्फे दिनांक 18 एप्रिल रविवार 2021 रोजी कोरोना संबंधीत सर्व नियम पाळुन रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
आज दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते असे ज्ञानेश्वर गाडेकर यांनी सांगितले तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही रोज जालन्यामध्ये ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर तसेच प्लाजमा अशा अनेक गोष्टींमध्ये वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन नेहमी मदत करत असतो आमच्या ग्रुप मध्ये अनेक देशातील आपला मराठा समाज जोडला गेला असल्यामुळे विदेशातही या ग्रुपच्या माध्यमातून अनेक वेळा मदत झाली आहे व इथून पुढेही या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या सर्व दात्यांचे आयोजकांच्या वतीने व तसेच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या संपूर्ण टिम च्या वतीने आभार मानण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी दादासाहेब सेलुटे संदीप कदम ज्ञानेश्वर गाडेकर गजानन इंगळे आकाश घनघाव नितीन उंबरे यांनी परिश्रम घेतले.