गजकेसरी स्टील कंपनीच्या मालकावर व गुत्तेदारावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा-सतिष वाहुळे
गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या घटनेतील कामगारांना मोबदला मिळावा
जालना-प्रतिनिधी
जालना शहरातील गजकेसरी नावाच्या स्टील कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 34 कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान कंपनीच्या भट्टीतील केमिकल अंगावर पडल्याने त््या ठिकाणी काम करणारे कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे.
तसेच भट्टी फुटल्याने कामगारांच्या अंगावर केमिकल उडल्याने काही कामगार जागीच ठार झाले असल्याचे स्थानिक कामगार यांच्याकडून माहिती आहे. यातील काही कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. घटना घडताच कंपनीला बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल हिसकावण्यात आले आहे.
जालना शहराचे स्टील कंपन्यांसाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये देखील नाव घेतले जातो. यामध्ये प्रामुख्याने राजुरी स्टील, कालिका स्टील ,पोलाद ,नामवंत कंपन्या जालना शहरांमध्ये आहेत. जवळपास 20 ते 25 स्टील इंडस्ट्री एकट्या जालना शहरामध्ये आहे . या कंपनीमध्ये बाहेरील राज्यातील जवळपास 40 ते 50 हजार कामगार काम करत असतात. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होत असतात. आतापर्यंत झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक कामगारांना आतापर्यंत आपला जीव गमावा लागलेला आहे तर काही लोकांना अपंगत्व देखील आलेलं आहे.
गजकेसरी रोलिंग मिलमध्ये झालेल्या मोठ्या अपघातात 34 कामगार जखमी झाले असून त्यांना मिल मालक व गुत्तेदारांकडून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व या घटनेची सखोल चौकाशी करुण रोलींग मिलचे मालक व गुत्तेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी जेणे करुन पुढील काळात ही घटना परत होणार नाही व कामगारांच्या जिवाशी मालक व गुत्तेदार खेळणार नाही.
जखमी कामगारांना तात्काळ न्याय देण्यात यावे नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन, रास्ता रोको, उपोषणे करण्यात येईल, असे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार आघाडीचे मराठवाडा कार्याध्यक्ष सतिष वाहुळे, जालना जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे, शहराध्यक्ष रवि भुजंग, शहर उपाध्यक्ष मिर्झा इम्रान बेग, वाहेद तांबोली, बाबासाहेब वाहुळे यांनी दिले.