कुंभार पिंपळगाव येथे नगरपंचायत मंजूरीसाठी तहसिलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे प्रस्ताव दाखल
नगरपंचायत मंजूरीसाठी प्रस्ताव दाखल करताना सरपंच शाहजानबी पठाण,अनवर पठाण, ग्रामविकास अधिकारी महादेव रूपनर,सय्यद मुक्तार,मनोज गायकवाड,स्वीय सहाय्यक मुळे आदी दिसत आहे
कुंभार पिंपळगाव/ कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे मोठ्या लोकसंख्येचा गाव आहे.या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा प्राप्त आहे.या गावांना परीसरातील तीस ते चाळीस गावे या बाजारपेठशी जोडलेली आहे.परंतु पाहिजे तसा विकास न झाल्यामुळे या ग्रामपंचायतीचा नगरपंचायत मध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे.त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या सुचनेनुसार दि 19 सोमवार रोजी घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे नगरपंचायत मंजूरीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला.यावेळी सरपंच शहाजानबी पठाण,अनवर पठाण, ग्रामविकास अधिकारी महादेव रूपनर,सय्यद मुक्तार, मनोज गायकवाड पालकमंत्री मंत्री राजेश टोपे यांचे स्वीय सहाय्यक प्रा.मुळे आदी उपस्थित होते.