लॉकडाउनबाबत परत जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे नवीन आदेश.
ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने निर्बंध व मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी निर्गमित केले आदेश.
जालना दि.20- जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ रोग अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये प्राप्त अधिकारान्वये जालना जिल्ह्यात यापूर्वीच्या आदेशान्वये नमुद उपाय योजना दि.1 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या आदेशात नमुद खालील बाबींच्या वेळेमध्ये अंशात सुधारणा करुन या उपाय योजना दि.20 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8.00 वाजेपासून ते दि. 1 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू करण्यात येत आहेत. सदरील उपाय योजना पुढील प्रमाणे.
• सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे, अंडीसह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी अवजारे, व शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने, पाळीव प्राणी पशु खाद्याची दुकाने ( पेट फुड शॉप ),तसेच नागरीकांसाठी तसेच संस्थांसाठी पावसाच्या हंगामासाठी साहित्याची दुकाने हे सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यतच सुरु राहील. तथापी दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येईल.
कुठल्याही व्यक्तीकडूंन या आदेशातील सुचनांचे उल्लंधन झाल्यास त्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई केली जाईल त्यासोबत भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.