मंठा तालुक्यातील 82 वर्षाच्या आजीबाईने केली कोरोना मात.
कमलबाई देशपांडे यांनी मिळविला कोरोनावर विजय.
मंठा प्रतिनिधी:- चारठाणा येथील वयोवृद्ध महिला श्रीमती कमलबाई मार्तंडराव देशपांडे यांनी वयाच्या 82 व्या वर्षी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करीत संसर्गजन् कोरोना आजारावर मात केली असून जगा समोर आदर्श ठेवला आहे.
श्रीमती कमलबाई देशपांडे यांची मागील पंधरा दिवस पूर्वी परभणी येथील मानवतकर हॉस्पिटल येथे RT- PCR टेस्ट असता त्यांना कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मनियार हॉस्पिटल येथे सिटी स्कॅन करण्यात आले. कोरोनाची लक्षणे पाहता त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या वर त्यांचा मुलगा रमेश देशपांडे याने कोवीड सेंटर मध्ये भरती न करता होम कोरनटाईन करण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती केली. कारण श्रीमती देशपांडे यांचे वय जास्त असल्याने व इतर पेशंट बघून धास्ती घेतली या भीतीपोटी चारठाणा येथील राहत्या घरी होम कोरनटाईम करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुसार त्यांना रोज सकाळी आयुर्वेदिक काढा, बदाम गोडंबी,अंजीर व मनुका व डॉक्टरांनी दिलेले मेडिकल कोमट पाण्यातून नियमित देण्यात आले. घरच्या वातावरणात राहिल्याने व योग्य आहार व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब केल्याने त्यांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा होऊन त्या कोरोना मुक्त झाल्या असून आज आपल्या परिवारसह राहत आहेत.व वयाच्या 82 वर्षात त्यांनी कोणावर मात केली आहे. कोरोना बाधित रुग्णांना जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.
कोरुना आजार झाल्यास भेण्याचे अजिबात कारण नाही घरच्यांनी स्वतःची व पेशंटची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तसेच पेशंटला धीर दिल्यास कोरोना हा शंभर टक्के बरा होतो पेशंट पासून जरूर अंतर ठेवावे पण पेशंटला सहानभूती दिल्यास त्याच्यात सुधारणा होण्यास मदतच होते अशी प्रतिक्रिया श्रीमती कमलबाई देशपांडे यांच्या सुनबाई संजीवनी देशपांडे यांनी दिली.