जालना जिल्हा

जालना:ऑक्सिजन पुरवठा खंडित व ऑक्सिजन गळती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

नाशिक येथे डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणारे आणि ऑक्सिजन बेडवर असणारे चोवीस रुग्ण ऑक्सिजन गळती झाल्यामुळे मृत्युमुखी पडले आहे.आणि त्या पार्शवभूमीवर जालना जिल्ह्यात देखील खबरदारी आवश्यक असून ऑक्सिजन पुरवठा खंडित ऑक्सिजन गळती होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी जावेदखा पठाण लोकसत्ता युवा संघटना ता.अध्यक्ष भोकरदन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदणाद्वारे केली आहे.
उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

नाशिकमध्ये जि घटना घडली तशी जालना जिल्ह्यामध्ये घडू नये यासाठी आपण तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यकअसून दुर्दैवाने अशी घटना घडलीच तर ती घटना तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी व तात्काळ ऑक्सिजनची होणारी गळती बंद करण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक यंत्रणा व मनुष्यबळ आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे जावेद पठाण यांनी म्हटले आहे . मुबलक प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता या काळात हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असून नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेत इतर रुग्णालयातील ऑक्सिजन टँकर मागवावा लागला होता ती वेळ आपल्या जिल्ह्यावर येऊ नये याची देखील खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे जावेद पठाण यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!