कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
– अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कु. पिंपळगाव शाखेच्या वतीने एस.एम.एस अकॅडमी येथे रक्तदान शिबिर गुरुवारी घेण्यात आले.
सध्याची COVID -19 ची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे याच पार्श्वभूमीवर अभाविपने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर घेण्याचे योजीले आहे .याचीच सुरुवात म्हणुन आज जालना शहरात जणकल्याण रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. मागील वर्षभरातील कोविडच्या काळात अभाविपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.सध्या दि.०१ मे पासुन वय वर्षे 18 ते 45 मधील सर्वांनाच लस दिली जाणार आहे एकदा लस घेतली की किमान 2 महिने रक्तदान करता येत नाही त्यामुळे लस घेण्यापूर्वी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे यासाठी अभाविपने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुढील काही दिवसात पुर्ण जिल्हाभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आहे.त्याचप्रमाणे अनुक्रमे जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेतले जाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील अभाविप करत आहे.
या रक्तदान शिबिरासाठी अभाविपचे शरद चाफाकानडे राहुल पवार किशोर मोरे
आकाश चाफकानडे आसाराम राऊत विक्रम राऊत रवींद्र काटकर आविष्कार इंगळे अनिकेत शेळके अंकिता कासट सुनील शिंदे विलास गुजर अंजली चाफाकानडे सोनाजी कंटूले कार्यकर्ते उपस्थित होते.