कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
गेल्या दोन महिन्यांपासून बीएसएनएल कंपनीसह अन्य खाजगी कंपन्याचे मोबाईल नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने परीसरात ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित कंपनीने लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दुरूस्ती करून नागरीकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याची मागणी परीसरातील ग्राहकांकडून केली जात आहे.बीएसएनएल व इतर खासगी कंपनीचे मोबाईल नेटवर्क अजिबात व्यवस्थित नसते, बँकिंग व्यवहारासाठी खूप अडचणी येत आहेत.संबंधित अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे,अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.