कोरोनाच्या आपत्ती काळात समाजाच देण लागतो या जाणिवेतून उपक्रम – विनायक चोथे
घनसावंगी येथे रक्तदान शिबिर संपन्न!
घनसावंगी येथे रक्तदान शिबिर संपन्न!
नितीन तौर/घनसावंगी
दि ४ मंगळवार,
रोजी घनसावंगी येथे संत रामदास महाविद्यालयात विनायक चोथे मित्रमंडळ व महाविद्यालयाचे व्यवस्थापन याच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उदघाटन स्वामी रामानंद शिक्षणप्रसारक मंडळाचे सचिव श्री विनायक चोथे, प.स.चे माजी सभापती महादेव काळे, सरपंच राम कोरडे,उमेश काजळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष किशोर शिंदे, उपाध्यक्ष गणेश ओझा,संतोष शिंदे अभिषेक दुकानदार यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिबिरात समर्थ रक्तपेठी जालना यांच्या सहाय्याने रक्तसंकलन करण्यात आले व एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप वाढेकर,आमोल आधुङे रवि शिंदे सागर पवार, मछिंद्र शिंदे, शैलेश रायकर,निलकंठ बोबडे,पवन नाईकनवरे, तपोवन काळे, शंकर शिंदे, अशोक तोडकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
ह्या कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्ती काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी १८ वर्षा वरील सर्वाना मोफत लसीकरण मोहीम जाहीर केली आहे, पण लस घेतल्या पश्चात 2 महीने रक्तदान करता येत नाही तेव्हा भविष्यात रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी रक्दान शिबिरे घेण्याचे जे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्या त्या प्रमाणे आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत आयोजक श्री विनायक चोथे यानी व्यक्त करत रक्तदात्यांचे आभार मानले.