घनसावंगी तालुका
जांबसमर्थ केंद्रावर आज लसीकरण
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला होता.त्यामुळे काही दिवस लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते.दरम्यान कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह पिंपरखेड, जांब समर्थ उपकेंद्रात गुरूवारी (ता.सहा) लस उपलब्ध झाली आहे.त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.४५ वर्षांवरील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ दिपाली चव्हाण-राठोड यांनी केले आहे.