घनसावंगी तालुका
जांबसमर्थ लसीकरण केंद्रावर 72 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील प्राथमिक शाळेमध्ये कोरोना लस उपलब्ध होताच लसीकरणास प्रारंभ झाला. ग्रामस्थांनी लस टोचून घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसुन येत आहे.
जांबसमर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी सकाळी १० वाजता कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी आरोग्य सेविका सी.एम. मेश्राम, आरोग्य सेवक सी.एम. चव्हाण,आशा गलबे,विजयामाला पवार,शिक्षक आर.डी. पवार, वासुदेव गायके, कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.लसीकरण उप केंद्रावर सकाळपासून 45 वयोगटाच्या पुढच्या नागरिकांना आणि महिलांना लस देण्यात आली. गावातील ग्रामस्थांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत असून गुरूवारी महिला आणि पुरुष मिळून 72 ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.