जालना जिल्हा
जालना जिल्ह्यात इतके डोस प्राप्त, बघा जिल्ह्यात कोठे होणार लसीकरण
जालना जिल्हयासाठी कोव्हिशील्ड लसीचे दहा हजार डोस प्राप्त
जालना, दि. 12 may (news jalna):- राज्यस्तरावरुन जालना जिल्ह्यासाठी कोव्हिशील्ड लसीचे दहा हजार डोस प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले.
जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण आरोग्य रुग्णालयांना लस वाटप करण्यात आली आहे. ही लस फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी व दुस-या डोसला प्राध्यान्य देण्यात येणार आहे. सध्या कोव्हॅक्सींन लसीचा पुरवठा अप्राप्त असून कोव्हीशील्डचा दुसरा डोस सहा आठवडयानंतर किंवा 42 दिवसानंतर घेण्यात यावा. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये, लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. तसेच लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर नियमित वापरावे आणि हात नियमित धुवावेत, असे आवाहनही आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.