दिवाळी अंक २०२१

डेंग्युला प्रतिबंध करुया – सुरुवात घरापासून करा आरोग्य विभागाचे आवाहन

डॉ. संतोष सी. कडले, जिल्हा हिवताप अधिकारी यांचे आवाहन

जालना दि.15- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सी कडले जालना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्यातचे महत्व व जनतेमध्ये जागरुता आणुन डांसापासून प्रसार होणाऱ्या डेंग्यु आजारावर प्रतिबंध करणे बाबत सांगण्यात आले.

images (60)
images (60)

मागील वर्षा पासून आपण कोविड-19 या महामारीत तोंड देत असून चालू वर्षी सुध्दा कोविड-19 विरुध्द आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी लढत आहे. या कठीण प्रसंगी आरोग्य खात्यातील कर्मचारी कोविड-19 या आजरा सोबत डेंग्यु या आजारावर सुध्दा नियमितपणे प्रतिबंधात्मक उपायायोजना राबवित आहेत.डासांची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी सहकारी आरोग्य यंत्रणासोबत सर्व जनतेचे सहकार्याची आवश्यकता आहे. लोकसहभाग शिवाय या आजारावर नियंत्रण शक्य नाही.

डेंग्यु ताप हा आजार विशिष्ट विषाणुमुळे होतो, या आजाराचा प्रसार “एडिस इजिप्टाय” नावाच्या डांसाच्या मादी मार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. निरउपयोगी वस्तु, टायर्स व कुलर इ. जास्त दिवस पाणी साठलेल्या ठिकाणी “एडिस इजिप्टाय” डासांची मादी अंडी घालते, एक डांस एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालतो व यातून या डासाचा मोइा फैलाव होतो.

डेंगयु ताप आजारात रुग्णास 2 ते 7 दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो, डोके दु:खी, स्थयु दु:खी असा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात, डोळयाच्या आतील बाजु दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड यातुन रक्तस्त्राव होणे, अश्क्तपणा, मुक मंदावणे, तोंडाला कोरड पडेण ही लक्षणे दिसुन येतात अशी लक्षणे दिसुन आलेल्या रुग्णास तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.

डेंग्युची मागील तीन वर्षाची परिस्थिती सन -2018 मध्ये 110 रुग्ण व मृत्यु 2, सन -2019 मध्ये 56 रुग्ण व मृत्यू निरंक, सन 2020 मध्ये 15 व मृत्यु निरंक, व सध्या एप्रिल 2021 अखेर निरंक आहे.

डेंग्यु आजार रोखण्यासाठी आपल्या घराभोवती पाणी साचू ठेवू नये, घरातील पाण्याचे सर्व साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत व या साठ्यातील आतील बाजू व तळ घासुन कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्योच साइे घट्ट झाकनाने झाकुन ठेवावे, आंगन व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेत तळे आहेत त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधुन गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करावी, झोपताना पुर्ण अंगभर कपडे घालावे, संध्याकाळी 6ते 8 चे दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, आपल्या घरी किटक नाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपुर्ण फवारुण घ्यावे, फवारलेले घर किमान 2 ते 2.5 माहिने सारवू ( रंगरंगीटी ) करु नये, घराच्या छतावरील फुटके डबे, टाकाऊ टायर्स, मडकी इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नहेमी बांधवा, दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकऊ ऑईल टाकावे, डेंगी ताप आजराची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय मोफत उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस सी कडले यांनी जनतेस केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!