दिवाळी अंक २०२१

जालन्यात खा. राजीव सातव यांच्या पार्थीव जात असतांना पुष्पवृष्टी !

रूग्णवाहिकेतून पार्थीव जात असतांना पुष्पवृष्टी

images (60)
images (60)

https://youtube.com/shorts/XcPsPjac-QA?feature=share

खा. सातव यांच्या अचानक मृत्यूमुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी ः आ. गोरंट्याल
जालना (प्रतिनिधी) ः अवघ्या 47 व्या वर्षामध्ये राज्यासह देशपातळीवर नावलौकीक मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाचे उमदे आणि तरूण नेतृत्व खा. राजीव सातव यांच्या अचानक मृत्यूमुळे महाराष्ट्रासह देशपातळीवर काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी स्व. खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पित करतांना आपल्या भावन व्यक्त केल्या.
रविवार रोजी खा. राजीव सातव यांचे पुणे येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचे भल्या पहाटे निधन झाले. त्यांना करोनाचा आजार झाला होता. त्यातून ते पुर्णपणे बरे झाले होते आणि त्यांचा निगेटीव्ह अहवाल देखील आलेला
असतांना अचानकपणे त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यांचे पार्थीव शरीर पुणे येथून औरंगाबाद मार्गे हिंगोली (कळमनुरी) कडे जात असतांना जालना येथे अंबड चौफुली येथे रविवारी दुपारी रूग्णवाहिकेतून पार्थीव जात असतांना पुष्पवृष्टी करून स्व. खा. राजीव सातव यांना जालना जिल्हा व शहर काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राजीव सातव अमर रहे अशा गगनभेदी घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.
आ. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भावना पुढे व्यक्त करतांना सांगीतले की, खा. राजीव सातव आणि माझे अत्यंत जवळचे मित्र आणि हितचिंतक होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. ही बाब सर्वांना माहित आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने काँग्रेस पक्षाची देशपातळीवरील मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघने कठीण असल्याचे श्री गोरंट्याल यांनी सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी श्रद्धांजली अर्पित करतांना खा. राजीव सातव यांच्या अचानकपणे जाण्याने मराठवाड्यातील एक उमदा नेता आणि कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा आणि त्यांच्या भावना जाणून घेणारा आपल्यातून गेल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची फार मोठे नुकसान झाल्याचे यांनी सांगीतले. महात्मा फुले समता परिषदेचे युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे यांनी स्व. खा. सातव यांना श्रद्धांजली अर्पित करतांना सांगीतले की, खा. राजीव सातव यांच्या प्रेरणेमुळे आपण समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला. परंतू स्व. खा. सातव यांच्या अचानकपणे मृत्यू झाल्यामुळे आपण खचून गेलो असल्याची प्रतिक्रीय त्यांनी व्यक्त केली.
स्व. खा. राजीव सातव यांच्या पार्थीवावर पुष्पवृष्टी करून भावपुर्ण श्रद्धांजली
अंबड चौफुली येथे स्व. खा. राजीव सातव यांच्या पार्थीवावर पुष्पवृष्टी करण्यात येवून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश सचिव विजय कामड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, भगवानसिंग ढोबाळ, राजेश काळे, अशोक उबाळे, चंद्रकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, आनंद लोखंडे, गणेश खरात, रमेश मुळे, गणेश वाघमारे, सिताराम अग्रवाल, अरूण घडलिंग, युवराज राठोड, प्रकाश जायभाय, सुंदरराव कुदळे, संदीप हुसे, दशरथ तोंडूळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!