जालना क्राईम

लग्नाच्या दिवशीच नववधूने प्रियकरासोबत घेतला गळफास

जालना न्यूज :

images (60)
images (60)

आज पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान मालखेडा येथे प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे नववधू स्नेहा राजू आव्हाड (वय 18) या तरुणीने अंगावर लग्नाची हळद लागलेली असताना व आज दुपारी स्नेहाचा विवाह होणार होता.
मात्र, या नववधूने लग्नाच्या दिवशीच
आपला प्रियकर नवनाथ सुरेश गायकवाड (वय 21) याच्यासोबत गळफास घेऊन दोघांनीही आपली जीवनयात्रा संपविण्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

समजलेली माहिती अशी की, मालखेडा येथील नवनाथ सुरेश गायकवाड या तरुणाचे मालखेडा येथे रस्त्यावर टायर पंचरचे दुकानाचा व्यवसाय सुरू होता.
नवनाथ याचे त्यांच्याच नात्यातील स्नेहा राजू आव्हाड रा. मुंबई या तरुणी सोबत वर्षभरापासून प्रेम संबंध होते.
आज दुपारी स्नेहाचा विवाह तालुक्यातील कोळेगाव येथील एका तरुणाशी पार पडणार होता. मात्र विवाहाच्याच दिवशी स्नेहा आणि नवनाथ कोळेगाव येथून मालखेडा येथे आले.
त्याठिकाणी टायर पंचरचे दुकान चालवीत होता, त्याच घरांमध्ये या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!