कुंभार पिंपळगावात एकाच दिवशी तीन दुकाने जळून खाक;सहा लाख रूपयांचे नुकसान
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगावात आज एकाच दिवशी गादी घर,मंडप डेकोरेशन,व मोबाईल दुकान या तिन्ही दुकानांना आग लागली असून यामध्ये पाच ते सहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.हि घटना दि.17 सोमवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील रहिवासी असलेले युनूस शेख यांच्या बसस्थानका समोरील वाहेद गादी घर यांच्या दुकानाला दि.१७ सोमवार रोजी शॉर्ट सर्किटमुळे सकाळी साडेनऊ वाजता आग लागली.या अग्नीतांडवामुळे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली.
तसेच त्यांच्या बाजूला असलेले प्रविण मंडप डेकोरेशन दुकानांचे साउंड सिस्टीम,स्पिकर, मशिन,मंडप,असे साहित्य मिळून दिड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.तसेच शेजारील दुकानाचे फर्नीचर व मोटारसायकल चे स्पेअर पार्ट महत्वाचे कागदपत्रे आगीत जळून भस्मसात झाले.सदरील दुकानांना आग लागली असल्याचे समजताच ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर बोलावून घेतले.आग विझविण्याचा प्रयत्न केला.व एकच धावपळ उडाली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.या घटनेचा उशीरापर्यंत पोलीसांकडून पंचनामा करण्यात आला नाही.