दिवाळी अंक २०२१

बघा खताची जालना जिल्ह्यातील किंमती, जास्त दराने विक्री केल्यास कारवाईचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई

images (60)
images (60)

 जालना दि. 17 (न्यूज जालना):-  जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणांच्या खरेदीची शेतक-यांकडुन लगबग सुरु आहे. माहे एप्रिल 2021 पासुन युरिया वगळता  इतर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एप्रिल 2021 पुर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी,10:26:26, 12:32:16, 20:20:13, 19:19:19, 24:24::0, 14:35:14 तसेच सिंगल सुपरफास्फेट  इ. रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत.

    जुन्या  व नविन दराची रासायनिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतक-यांनी खरेदी करतांना खताच्या गोणीवरील किरकोळ कमाल विक्री किंमत पाहुनच खताची खरेदी करावी. तसेच रासायनिक खत विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या ई-पास मशीनची पावती विक्रेत्याकडुन घ्यावी व त्यावरुन रासायनिक खताचे किंमतीचे पडताळणी करता येईल.

   केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीयंट बेसड सबसिडी) धोरणानुसार युरिया वगळता इतर खताचे दर निश्चित करण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीस असल्याने बाजारामध्ये एकाच प्रकारच्या खताचे वेगवेगळ्या खत कंपनीचे भाव वेगळे असल्याने शेतक-यांनी खरेदीच्यावेळी वरील बाबींची खात्री करावी. तसेच काही विक्रेत्याकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलब्ध असुन देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत, बियाणे व किटकनाशक बाबत तक्रारी असल्यास आपल्या तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हास्तरावरील कृषि निविष्ठा कक्षातील मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जालना एस.व्ही कराड 9404452777 व जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जालना व्ही.डी. गायकवाड 8483983886 यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंद्र व कृष्ज्ञि विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

रासायनिक खताचे जुने व नविन दर सन 2021

अ.क्र.रासायनिक खत प्रकारइफकोआरसीएफझुआरीकोरामंडलपॅरादीप फॉस्फेट लि.GSFC
  जुने दरनविन दरजुने दरनविन दरजुने दरनविन दरजुने दरनविन दरजुने दरनविन दरजुने दरनविन दर
110:26:2611751775  12251775118516001225177512751775
212:32:1611851800  12351800  1235180012851800
320:20:0:1392513501150 101514009501300101514009751350
424/24/0      13101750    
5DAP12001900  13251900125017001325190013001900
6MOP    8751100  8751100850 
719:19:19    12851875  12851875  
815:15:15  1007   10401400    
914:35:14      12751725    
10SSP      

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!