जालना जिल्हा:शेतकरी बांधवांनी पिककर्जासाठी ऑनलाइन करा जिल्हाधिकारी यांचे आवाहन
पीककर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
न्यूज जालना, दि. 18 :- खरीप हंगाम 2021 -22 करीता जिल्हयामध्ये बँकांतर्फे पीककर्ज वाटप सुरु आहे. जागतिक महामारी कोवीड -19 विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडुन राज्यामध्ये संचारबंदी /जमावबंदी घोषीत करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोविड -19 या आजाराचा प्रसार होऊ नये, .यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्हयातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://forms.gle/XQz2RZQcZr7eBSvi8 या गुगल लिंकवर ऑनलाईन अर्ज भरुन पीककर्ज मागणी नोंदणी दि.21 मे 2021 ते 15 जुन 2021 या दरम्यान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पीककर्जासाठीची लिंक jalna.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक,जालना यांच्यामार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडे पीककर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, 7/12, 8-अ, फेरफार नक्कल , पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज 2 फोटो ,पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. तसेच सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडुन प्राप्त करुन घ्यावी.
पीककर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर गुगल लिंकवरील फॉर्म भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करुन प्रशासनस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.