कोरोना अपडेट
जालना जिल्ह्यात उद्या इतके लसीकरण डोस उपलब्ध .
जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 3 हजार 100 तर कोव्हॅक्सीनचे 1 हजार 400 डोस प्राप्त
जालना, दि. 19 (न्युज जालना) :- जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्ड लसीचे 3 हजार 100 डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असुन लस शिल्लक राहिल्यास 45 वर्षावरील वयोगटाकरिता पहिल्या डोससाठी लसीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचे 1 हजार 400 डोस प्राप्त झाले असुन ही लस ४५ वर्षावरील वयोगटाकरिता दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन अपाईंटमेंट (निश्चित मिळालेल्या वेळेनुसार) दिली जाणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, विवेक खतगावकर यांनी केले आहे.