पशूधनाची खरेदी विक्री बंद;शेतकऱ्यांचे हाल
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कोरोना महामारी मुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे.बाजारपेठेबरोबरच जनावरांचे आठवडी बाजार ही बंद आहे.यामुळे पशूधन खरेदी विक्री बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत.पेरणीचे दिवस तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.अनेक लोक शेतीची कामे ट्रॅक्टर किरायाने घेत करून घेत आहे.कोरोना संसर्ग दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात अधिक वेगाने मोठ्या प्रमाणात पसरत आहे.घराघरांत कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे.अनेकांचा बळीही जात आहे.यामुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे.मागील दोन महिन्यांपासून कडक लाकडाउन करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्हाभरातील छोट मोठे आठवडी बाजार जनावरांचे बाजार बंद आहेत.यामुळे शेतकऱ्यांना पशूधन खरेदी विक्री साठी मोठी अडचणी येत आहेत.गावाबाहेर फिरणेही जिकरीचे बनले आहे.त्यामुळे बैलजोडी पाहणे शक्य होत नाही.बैलजोडी पाहिल्याशिवाय खरेदी करण्याचे धाडस होत नाही.धाडस करून एखादी बैलजोडी पसंत पडेलच असे नाही.यात शेतकऱ्यांची चांगलीच ससेहोलपट होत आहे.
ट्रॅक्टच्या यंत्राने मशागतीचे भाव गगनाला ….
कोरोनामुळे सध्या जनावरांचे पशूधन खरेदी विक्री आठवडी बाजार बंद आहे.मान्सून अगदी तोंडावर येवून ठेपला आहे.या परिस्थितीत शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रक्टर व इतर यंत्रणा यांचा आधार घ्यावा लागत आहे.या वर्षीचे १, हजारावरून १६०० रूपयावर गेले आहे.इतर कामांचेही भाव गगनाला भिडले आहेत.डिझेलचे दर वाढल्याने मशागतीच्या कामांना दर वाढवला असल्याचे ट्रक्टर चालक सांगत आहे.’