सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न
अंत्यसंस्कारासाठी गुरु शिष्य परिवाराने दिले 6 टन लाकुड
जालना (प्रतिनिधी) ः सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या गुरु शिष्य परिवाराने जालना येथील गांधी नगर भागातील मुक्तीधाम स्मशानभुमीत करोना बाधीत मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 6 टन लाकुड देत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्याबरोबरच गावातील विद्यार्थ्याच्या व शाळेच्या उत्कर्षासाठी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून गुरु शिष्य परिवाराची स्थापना केली असून या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. करोनामुळे दररोज मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे येथील मुक्तीधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमतरता भासत असल्यामुळे गुरु शिष्य परिवारातील सदस्यांनी सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणुन 6 टन लाकुड उपलब्ध करुन दिले आहे.
गुरु शिष्य परिवारातील किशोर खंडाळे, श्री. लाड, दहिवाळ, गजभिये, चव्हाण, भगवान मोरे, ओळेकर, कोळी, देशपांडे तसेच तळणी, अकोला (नि) केळीगव्हाण, खादगाव असोला, डावरगाव, जालना, मानेगांव तांडा, पोकळवडगाव, पुणेगाव, जामवाडी येथील परिवार सदस्य दत्ता शेळके, प्रताप उजेड, शौकत, बाबासाहेब ओळेकर, जगदीश गीते यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.