घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव येथे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णूपंत कंटुले यांना श्रद्धांजली
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णूपंत कंटुले यांचे नुकतेच उपचारादरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले आहे. त्यांना कुंभार पिंपळगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
यावेळी स्व. विष्णूपंत कंटुले यांनी त्यांचे संपुर्ण जीवन कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हि जबाबदारी सांभाळत एकनिष्ठेने काम केले. यावेळी श्रद्धांजली अर्पण करतांना मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर ,समाजसेवक रामेश्वर लोया,तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, पत्रकार लक्ष्मण बिलोरे, कौतिक घुमरे,अभिषेक दुकानदार, संतोष बोटे, अशोक कंटूले,मोहन मुगसे,आनंदे, भाऊ शिंदे आदी ची यावेळी उपस्थिती होती.