घनसावंगी तालुका

लॉकडाउनच्या शुभ ‘मुहूर्तावर’ उरकताहेत अल्पवयीन मुलींचे ‘शुभमंगल’ सावधान!

images (60)
images (60)

प्रशासन बालविवाह रोखण्यास अनभिज्ञ

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

मुलींचे वयोवर्ष १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय बालविवाह कायद्या अंतर्गत बालविवाह करता येत नाही.तसे बालविवाह होत असल्यास संबंधित व्यक्तिवर गुन्हा दाखल होऊ शकतो.मात्र याला ग्रामीण भाग अपवाद ठरत आहे.शासनाकडून मुलींच्या शिक्षणासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अशा योजनेवर लाखों रूपये खर्च करीत असून मात्र बालविवाहाच्या संदर्भात समाजात जनजागृती करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात प्रशासन जनजागृती करताना दिसत नाही.म्हणून काही असुक्षित नागरीक,ऊस तोड कामगार अल्पवयीन मुलींचे पालक हे लॉकडाउनचे शुभ मूहूर्त साधत अल्पवयीन मुलींचे लग्न कार्य पार पडत आहे.महिला व बालकल्याण समिती,बाल संरक्षण समिती,बालविकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी ग्रामसेवक, पोलीस प्रशासन, व अंगणवाडी सेविका यांच्याकडे बालविवाह रोखण्याची जबाबदारी असताना, संबंधित प्रशासनास दिलेल्या कार्यांचे विसर पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे लॉकडाउन सुरू असताना घराबाहेर निघण्याचीच कोंडी निर्माण झाली असतानाच दुसरीकडे शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत जास्त लोकांच्या उपस्थितीत जास्त खर्चात बालविवाह ‘उरकून’ घेण्याकडे ग्रामीण भागात जणू पेव फुटले आहे.ग्रामीण भागात शर्यतीप्रमाणेच बालविवाह उरकले जात आहे.ग्रामीण भागात बालविवाह करण्याची प्रथाच पडली आहे. बालविवाहाचे लग्न कार्य म्हणजे एकाप्रकारे कोरोना महामारीला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.बालविवाह रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलींचे आई व वडिलांना समुपदेशन करून समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे.याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बालविवाह रोखण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!