जालना जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या
Newsjalna-पोलीस नियंत्रण कक्षातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकांना नेमणुका
जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सोमवारी उशिरा जालना जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत सदर बाजार पोलिस ठाण्यात असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार आणि तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मोतीराम बगाड यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची सदर बाजार पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील सोमनाथ नरके यांची अंबड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांची गोंदी आणि रविंद्र अंभोरे यांची तालुका जालना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे बदली करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.