जालना जिल्ह्यात चार दिवसात 21 हजार अँटीजन चाचणी तर 265 पॉझिटिव्ह
जालना जिल्ह्यात 25 मे रोजी 7 हजार 231 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी
न्यूज जालना दि. 25 :- जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले मागील तीन दिवसात जिल्ह्यात एकूण 21 हजार च्या वर अँटीजन चाचणी करण्यात आली आहे . त्यात 265 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे
यात 25 मे 2021 रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
सामान्य रुग्णालय जालना येथे एकुण 16 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 15 निगेटिव्ह आले आहेत.जालना शहरात एकुण 649 त्यामध्ये 2 पॉझिटिव्ह व 647 निगेटिव्ह आले आहेत. जालना ग्रामीण रुग्णालयात एकुण 505 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 504 निगेटिव्ह आले आहेत. बदनापुर येथे एकुण 578 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह व 574 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 1 हजार 47 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 10 पॉझिटिव्ह व 1 हजार 37 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 752 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 4 पॉझिटिव्ह व 748 निगेटिव्ह आले आहेत. भोकरदन येथे एकुण 1 हजार 97 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 8 पॉझिटिव्ह व 1 हजार 89 निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे एकुण 823 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 6 पॉझिटिव्ह व 817 निगेटिव्ह आले आहेत.परतुर येथे एकुण 988 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 10 पॉझिटिव्ह व 978 निगेटिव्ह आले आहेत. मंठा येथे एकुण 751 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 2 पॉझिटिव्ह व 749 निगेटिव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय, जालना येथे एकुण 25 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही . अशा प्रकारे एकुण जिल्ह्यात दि. 25 मे 2021 रोजी 7 हजार 231 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 48 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 7 हजार 183 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या तपासणी मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले आहे