घनसावंगी तालुका

विरेगाव शिवारात जीर्ण तारा व विजेचे खांब वाकलेले ;महावितरणचे दुर्लक्ष

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील विरेगाव येथील शेतशिवारात विजेचे खांब वाकलेले असून विद्युत तारा या जीर्ण झाल्याने पूर्णपणे लोंबकळलेल्या आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे करताना विजेचे खांब व लोंबकळणाऱ्या तारा या शेतकऱ्यांसाठी धोकादायक व अडसर ठरत आहे.याकडे महावितरणचे सोयीस्कर पणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे विरेगव्हाण तांडा येथील शेतकऱ्यांचा आठ एकर ऊस जळाला होता.या शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार मागणी करूनही पोल जैसे थे वैसे च्या अवस्थेत उभे आहेत. महावितरण मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. विरेगव्हाण येथील विजेचे पोल पूर्णपणे वाकलेले आहेत.येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात झाल्यास जमीन भुसभुशीत होऊन विजेचे खांब कधीही कोसळू शकतात.विजेचे पोल खाली पडल्यास शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केल्यानंतर महावितरण कंपनीला दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.झोपेचे सोंग घेणाऱ्या महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी विजेचे खांब व लोंबकळणाऱ्या तारा दुरूस्ती करावेत,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!