जालना जिल्ह्यात ह्या ठिकाणी असेल लसीकरण व इतके असेल डोस उपलब्ध
जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 14 हजार 200 तर कोव्हॅक्सीनचे 1 हजार 800 डोस प्राप्त
जालना, दि. 27 जालना जिल्ह्यासाठी कोव्शिल्ड लसीचे 14 हजार 200 डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांना व शहरी पाणीवेस, रामनगर व नुतन वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात येणार असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील पहिल्या व दुस-या डोससाठी दिली जाणार आहे. दुस-या डोसचे अंतर 84 दिवसाचे आहे. त्यामुळे कोविन पोर्टप्रमाणे ज्याचा दुसरा डोस 84 दिवसानंतर येईल त्यांनीच लसीकण केंद्रावर यावे.
कोव्हॅक्सीन लसीचे 1 हजार 800 डोसेस प्राप्त झाले असुन जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय भोकरदन, घनसावंगी, मंठा, परतुर उपजिल्हा रुग्णालय अंबड व जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे वाटप करण्यात आले आहेत. ही लस फक्त 45 वर्षावरील वयोगटाकरीता दुस-या डोससाठीच दिली जाणार आहे. लस घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अपॉईंमेंट घेणे अत्यावश्यक आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील त्रिसुत्रीचा वापर करावा मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे.
तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी केले आहे