घनसावंगी तालुका
वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले; वीजपुरवठा खंडित
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात आज दुपारी चार वाजता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घनसावंगी येथून येणाऱ्या ३३ केव्ही विज वाहिन्यांचे सिंदखेड जवळ दोन विद्युत पोल आज पडले आहे.त्यामुळे विज पुरवठा खंडित राहणार असून ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे.सदरील विजेचे खांब दुरूस्त करून वीजपुरवठा त्वरीत सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आज वादळी वाऱ्यामुळे सिंदखेड जवळ विजेचे खांब पडले असून संबंधित काम हे युद्धपातळीवर सुरू असून उद्या दुपारनंतर विद्युत पुरवठा सुरळीत चालू होईल अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रदिप कांबळे यांनी न्यूज जालनाशी बोलताना दिली.