कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात 28 मे रोजी 6 हजार 46 व्यक्तींच्या अँटीजेन चाचणी:17 जण पॉझिटिव्ह

images (60)
images (60)

जालना दि.28 :-   जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  अँटीजेन तपासणीचे काम सुरु करण्यात आले असुन दि. 28 मे 2021  रोजी करण्यात आलेल्या अँटीजेन तपासणीची माहिती खालीलप्रमाणे आहे.

       सामान्य रुग्णालय जालना येथे एकुण 6 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह व 5 निगेटिव्ह आले आहेत.जालना शहरात एकुण 1 हजार 286  तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 1 हजार 286 निगेटिव्ह आले आहेत.  जालना ग्रामीण येथे एकुण 630 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0पॉझिटिव्ह व 630 निगेटिव्ह आले आहेत.  बदनापुर येथे एकुण 650 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 650 निगेटिव्ह आले आहेत. अंबड येथे एकुण 685 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 8 पॉझिटिव्ह व 677 निगेटिव्ह आले आहेत. घनसावंगी येथे एकुण 568 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 3 पॉझिटिव्ह व 565 निगेटिव्हआले आहेत. भोकरदन येथे एकुण 832 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 5 पॉझिटिव्ह व 827 निगेटिव्ह आले आहेत. जाफ्राबाद येथे एकुण 368 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व 368 निगेटिव्ह आले आहेत.परतुर येथे एकुण 456 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0 पॉझिटिव्ह व  456 निगेटिव्ह आले आहेत. मंठा येथे एकुण 548 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 0  पॉझिटिव्ह व 548 निगेटिव्ह आले आहेत.   जिल्हा स्त्री रुग्णालय जालना यैथे एकुण 17 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये  0 पॉझिटव्ह 17 निगेटिव्ह आले आहेत.. अशा प्रकारे जिल्ह्यात एकुण दि. 28 मे 2021 रोजी 6 हजार 46 तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये 17  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 6 हजार 29 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

      या तपासणी  मोहिमेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वत:साठी व कुटुंबियांसाठी कोरोना संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ॲटिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!