जालना क्राईम

घनसावंगी महसूल प्रशासनाची धडाकेबाज कार्यवाही : वाळु माफियांचे धाबे दणाणले!

माफियांचे धाबे दणाणले!

घनसावंगी :नितीनराजे तौर

images (60)
images (60)

: घनसावंगी तालुक्यातील भादली येथे महसूल प्रशासनाच्या वतीने भल्या पहाटे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करून चार ट्रॅक्टर व आठ ट्रॉली अशी वाहने जप्त करण्यात आली. गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा व वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर संयुक्त कार्यवाही करण्यात आली, यावेळी आज शनिवार (ता.29)पहाटे चार च्या सुमारास तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कार्यवाही करण्यात आली यामध्ये विशेष स्वतः तहसीलदार हे उपस्थित होते,परिसरातील त्रस्त नागरिकांची मागणी व अवैधरित्या वाळु चा व वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी या पथकाने यशस्वीपणे कार्यवाही केली यामध्ये भादली येथे गोदावरी पात्रात अवैधरित्या वाळु ऊपसा व अवैध रित्या वाहतूक करणारे चार ट्रक्टर आणि नऊ ट्राली मध्ये वाळु भरली असताना  गोदावरी पात्रात सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास वाहने पकडून कार्यवाही केली यामुळे वाळू तस्करात एकच खळबळ उडाली आहे यावेळी जप्त वाहणे व कार्यवाहीत पोलीस निरीक्षक घनसावंगी नितीन पतंगे यांच्यासह पोलीस फौजफाटा उपस्थित होता या कार्यवाहीत घनसावंगी तहसीलदार नरेंद्र देशमुख,मंडळ अधिकारी सुधाकर बोटुळे,तलाठी एस.खोतकर , तलाठी अक्षय देशमुख, तलाठी संजय कुलकर्णी, नितीन काचेवाड, किशोर गायकवाड, नारायण येवतीवाड, गणेश मिसाळ,युवराज तुपसमुदर, रमेश काबळे,तलाठी शिदे, कोतवाल अनिल बडे,सोमनाथ लोढे,घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पतंगे,पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे,हे. कॉ. रामदास केन्द्रे,बी बी हरिषचंद्र,रंजित खटावकर,विठ्ठल वैराळ, होमगार्ड पवार, राठोड तसेच गुंज व भादली येथील ग्रामस्थांनी मदत केली असल्याची माहीती तलाठी संजय कुलकर्णी यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!