20 रुग्णवाहिकांचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण
जालना, दि. 31 जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीच्या 20 रुग्णवाहिकांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याण सपाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, बप्पा गोल्डे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीकोनातुन 500 रुग्णवाहिकांची खरेदी केली असुन जालना जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यासाठी आणखीन रुग्णवाहिकांची आवश्यकता असुन त्याही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.