जालना जिल्हा

जालना: पहा लॉकडाउन बाबत जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश

ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आदेश निर्गमित

images (60)
images (60)

            जालना दि. 31- राज्य शासनाने जिल्हा  क्षेत्रात२९ मे २०२१ च्या तारखेनुसारआठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरून कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर त्‍याठिकाणी (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे ) खालीलप्रमाणे निर्बंधदिनांक १५ जून 2021 रोजीच्‍या सकाळी 7.00 वाजेपर्यंत  शिथिल करण्यात येतील. असे निर्देशित केले आहे. त्यानुसार

             जालना जिल्‍हयातील २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर 1.77 ट कके येत असून आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स पैकी केवळ ३८.९० टक्‍के बेड भरलेलेआहेत.

त्यानुसार  जिल्‍हादंडाधिकारीतथा अध्‍यक्ष जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५, साथ रोग अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ अन्‍वये प्राप्‍त अधिकारान्‍वये जालना जिल्‍हयात वरील संदर्भ क्र.२2 अन्‍वये शासनाने दिलेल्‍या निर्देशांप्रमाणे वरील संदर्भ क्र.21 अन्‍वये लागू केलेल्‍या निर्बंधामध्‍ये दिनांक १५ जून 2021 रोजीच्‍या सकाळी 7.00 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्‍हयात शि‍थीलता आणून खालील प्रमाणे शिथीलतेसह निर्बंध लागू करीत असल्याचे आदेश जारी केले आहे.

1.       सर्व अत्‍यावश्यक दुकाने ज्यास सध्या सकाळी 7.०० ते 11.००वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍यास परवानगी आहे ते या पुढे सकाळी 7.०० ते सकाळी 11.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

2.      सर्व बिगर अत्‍यावश्यक दुकाने (स्टँडअलोन शॉप्स आणि शॉपिंग सेंटरमध्ये / मॉल्समध्ये नसलेले) सकाळी 7.०० ते सकाळी 11.००वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात येत आहे. शनिवार व रविवार सर्व बिगर अत्‍यावश्यक दुकाने पुर्णवेळ बंद राहतील.

3.      जालना जिल्‍ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व हॉटेल, ढाबा, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्‍टॉरंट, भेळ गाडे, पाणीपुरी गाडे, नाष्‍टा सेंटर /गाडे, रसवंतीगृह, चायनिज सेंटर, पाव भाजी सेंटर, इत्‍यादी ग्राहकांसाठी पुर्णतः बंद राहतील. तथापी केवळ पार्सल  सुविधेसाठी (Take Away) सुरु राहतील. त्‍याठिकाणी सर्वांनी कोविड-19 बाबतचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक तत्‍वे सक्‍तीने पाळावेत व मास्‍क, सॅनिटायझर, स्‍वच्‍छता, सोशल डिस्‍टंसींग, इ.चे पालन करणे बंधनकारक राहील. सर्व संबंधीत यंत्रणा / पोलीस विभाग /नगर परिषद/नगर पंचायत/अन्‍न व औषध प्रशासन, इ. विभागांनी याचे पालन होत असल्‍याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. संबंधीत आस्‍थापनांचे चालक हे कोविड-19 बाबतच्‍या सदरील नियमांचे पालन करीत नसल्‍याचे निर्दशनास आल्‍यास त्‍यांचेवर तात्‍काळ बंद करण्‍याची कार्यवाही करावी.

4.    लॉजींग सुरु राहतील तथापी तेथील व्‍यक्‍तींची जेवणाची सोय लॉजच्‍या डायनिंगमध्‍ये न करता संबंधीताच्‍या रुममध्‍ये देण्‍याची सुविधा संबंधीत लॉज मालकांनी करावी. कोविड-19 बाबतचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक तत्‍वे सक्‍तीने पाळावेत व मास्‍क, सॅनिटायझर, स्‍वच्‍छता, सोशल डिस्‍टंसींग, इ.चे पालन करणे बंधनकारक राहील.

5.     जालना जिल्‍हयातील सर्व नगर परिषदव नगर पंचायत हद्दीमधील सर्व पानटप-या पुर्णतः बंद राहतील.

6.      ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्‍यावश्यक वस्तूंसह बिगर अत्‍यावश्यक वस्तूंच्या वितरणाची परवानगी राहील.

7.     दुपारी 12.०० वाजेनंतर वैद्यकीय आणि इतर आपत्कालीन परिस्थिती वगळता, किंवा 12 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार परवानगी मिळालेल्या होम डिलिव्हरीशिवाय इतर वाहतुकीवर निर्बंध राहतील.

8.     कोरोनासंदर्भातील कामजाशी थेटसंबंधनसणारी सर्व सरकारी कार्यालये २5% उपस्थितीसह कार्यरत राहतील. संबंधित विभाग/कार्यालय प्रमुखयांनी विनंती केल्यास संबंधित आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रधिकरण या उपस्थितीच्या टक्केवारीपेक्षा अधिक उपस्थितीला परवानगी देईल.

9.      कृषी क्षेत्राशी संबंधित दुकाने सकाळी ७.०० ते सांयकाळी ७.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.

10.  दुकानांना व आस्‍थपनांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास,संबंधीत दुकान कोरोना महामारी म्‍हणून अधि‍सूचित असेपर्यंत सील करण्‍यात येईल तसेच शासनाच्‍या १२ मे 2021 च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

11.   सर्वधर्मिय धार्मिक / प्रार्थना स्थळे बंद राहतील.सर्वधार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्यापारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतू यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांसप्रवेश असणार नाही.

12.  कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणी राजकीय कार्यक्रम यांनापरवागनी असणार नाही.

13.  सिनेमा हॉल, नाटक थिएटर आणि प्रेक्षागृह, करमणूक पार्कस् / आर्केड्स / व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुल, जीम, केशकर्तनालय / स्‍पा /  सलून / ब्‍युटी पार्लरबंद राहतील.      

   कूठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्‍लंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार कारवाई केलीजाईलत्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल,असे ही आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांनी नमुद केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!