पावसामुळे शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त
कुंभार पिंपळगाव परिसरातील चित्र;बी-बियाणे खरेदीसाठी लगबग
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी/ कुलदीप पवार घनसावंगी
घनसावंगी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरससल्याने बळीराजाची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.कुंभार पिंपळगाव सह परिसरातील शेतकरी कपासीच्या लागवडीत गुंतला आहे. तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने सर्वञ हजेरी लावल्याने बळीराजाची मशागत व लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. पाऊस सलग तीन चार दिवसांपासून तालुक्यात सर्वञ जोरदार बरसत असल्याने अनेक शेतक-यांची अर्धवट राहेलेली मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर पाण्याचा अभाव असणारे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत गोदापट्यातील शेतक-यांनी पेरणीला सुरवात केली असून मृग नक्षञावर कपाशी लागवड करणारा शेतकऱ्यांने आता रोहिणी नक्षञावर कपाशी लागवडीचा श्री गणेशा केला आहे. बी बियाणे खरेदी ट्रॅकर मशागती साठी शेतकरी उसनवारी करून आर्थिक गणित जुळवण्याचा आटापिटा चालू आहे.निसर्गाने साथ दिली.तर पिके जोरात येतील व बाजारात रास्त भाव मिळेल या आशेने बळीराजाने देवाला साकडे घातले आहे. त्याच बरोबर बि बियाने औषधे खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी कृषी विभागाने ठोस पावल उचलावीत अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.