युवा संघर्ष आयोजित रक्तदान शिबीर संपन्न
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथे शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याचे औचीत्य साधून युवा संघर्ष ग्रुप वालसा (डा.)
यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर नियोजन केले,दरम्यान कोरोना महामारीच्या काळात सामाजिक अंतर ठेवून मास्क, सॅनिटायझर वापर करून व कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना रक्तदान करता येणार नाही. याची जाणीव ठेवून लस घेण्यापूर्वी प्रत्येकाने रक्तदान शिबीर ठेवण्यात आले,तसेच मी रक्तदान करणार माझ्या भावाला जीवनदान देणार असे म्हणत युवकांनी शिबिराला प्रतिसाद दिला.यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढीचे कुलकर्णी सर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करण्यासाठी बाहेर गावावरून युवकांनी प्रतिसाद दिला या वेळी रक्तदात्याला रक्तदान केल्यानंतर एक झाड /पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी युवा संघर्ष ग्रुपचे दत्तू वाघ,वैभव वाघ, रामेश्वर जाधव,डॉ योगेश वाघ,ज्ञानेश्वर कऱ्हाळे,सुनिल कऱ्हाळे, सतीश कलभिले, गणेश वाडेकर. रमेश वाडेकर. अमोल वाडेकर डावरगांव (वा) तसेच अनिल बूजाडे S.R.P.F,मारोती जाधव. वालसा खालसा . अंगद पाटिल सोयगांव.आदी उपस्थित होते.
