अनुप मंडळ च्या विरोधात आर.जे.एम.ओ. व सकल जैन समजातर्फे उपविभागीय अधिकारी मार्फ़त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
मधुकर सहाने : भोकरदन
संकट काळात जैन समाज नेहमी देशासाठी पुढे आलेला आहे हे जगजाहिर आहे,राजस्थान मधील जालोर,बाड़मेर,जोधपुर,सिरोही व पाली जिल्ह्यातील गावांमध्ये राहत असलेल्या भोल्या भाल्या लोकांना अनूप मंडळ चे सदस्य राज्यात व देशात आलेली कोरोना महामारी,अवकाळी वादळ, बरमुडा ट्रेंगल, सारखी आपत्ति जैन समाज व त्यांच्या धर्मगुरु तर्फे होत असल्याचे सांगून लोकांमध्ये जैन समाज बद्दल अपप्रचार करुण जैन समाजाची बदनामी करण्यात येत आहे.
कुठेतरी या अनुप मंडळवर बंदी आणली पाहिजे म्हणुन भोकरदन येथे राष्ट्रीय जैन माइनोरिटी ऑर्गनाईजेशन व सकल जैन समाजाने उपविभागीय अधिकारी मार्फ़त पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,राजस्थान मुख्यमंत्री आशोक गेहलोत व विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांना निवेदन दिले यावेळी अनुप मंडळ च्या विरोधात सीबीआई चौकशी करुन व जैन साधु साध्वीनां संपूर्ण भारतात संरक्षण देण्यात यावे असे बोलताना आर.जे.एम.ओ. चे जिल्हा अध्यक्ष मयुर बाकलीवाल यांनी सांगितले तर अनुप मंडळ ची वेब साईट,व सोशल मीडिया अकॉउंट वर बंदी घालण्यात यावी व जैन समाजाच्या भावना दुःखाविल्या असून अनुप मंडळ वर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा उपाध्यक्ष संतोष अन्नदाते यांनी सांगितले या निवेदनावर अमित खुळे,स्वप्निल पांडे,आयुष जैन,विशाल लोहाड़े,आदर्श जैन,विरेंद्र काला,अशोक लोहाड़े,निर्मल पानसरिया,अमित लोहाड़े संजोश बाकलीवाल, मयुर आंबेकर, उदय आंबेकर,रोहित बाकलीवाल आदिंच्या सह्या आहेत.