दिवाळी अंक २०२१

शिवराज्याभिषेक दिन भोकरदन येथे उत्साहात साजरा

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समीतिच्या आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथमत: छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास दुग्धअभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तर यानंतर उपस्थीत शिवप्रेमींच्या वतीने महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
त्यानंतर भगवी पताका रोवुन छत्रपतींचा जयघोष करण्यात आला.

यावेळी प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जे नियम आखुन दिले आहे त्या नियमांचे पालन करून यावर्षी शिवराज्याभिषेक दिन मोजक्या शिवप्रेमींच्या उपस्थीतीती साजरा करण्यात आला.
यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद नाना मिरकर,सचिव सुरेश पाटील तळेकर,महेश पुरोहीत,सतीश बापु रोकडे,त्रिंबक अप्पा पाबळे,छावा संघटनेचे ता.अध्यक्ष विष्णु पाटील गाढे,अप्पासाहेब जाधव,प्रा.अंकुश जाधव सर,बबन जंजाळ सर,नारायण जिवरग सर,सुहास देशमुख,मंगेश पगारे,नेव्हार सर,विनय पवार,रामेश्र्वर जंजाळ,डाँ रामनाथ काळे,मधुकर ढोले,संतोष घोडके,अमोल जाधव आदींसह शिवप्रेमीची उपस्थीती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!