लग्नात वराडी मंडळींना केले वृक्ष वाटप,जळगाव सपकाळच्या युवकाचा उपक्रम
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथिल युवकाने पुढाकार घेत येणार्या वराडी मंडळींना पर्यावरण जोपासण्याचा संदेश देत ५जुन रोजी पर्यावरण दिवस असल्याने या दिवशी १०० वृक्षांचे वाटप केले.
राज्य भरात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहे, आपणास विनंती आहे की, ह्या 5 जुन ला पर्यावरण दिवस आहे, ज्या कुणाचे नातेवाईक रुग्ण कोविड कारणाने मरण पावले असतील, त्यांनी किमान 5 झाडे लावावी, पर्यावरणाचा होणार ऱ्हास टाळण्यासाठी वड, पिंपळ, अडुळसा, कडुनिंब ह्या सारखी झाडे लावण्यात येणार असून आपणास विनंती करतो की आपण ही, आपल्या जवळच्या गेलेल्या व्यक्ती च्या स्मरणार्थ किमान ५झाडे आपल्या भागात मध्ये लावावी,व जगवावी किंवा आमच्या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे.
आज जागतिक पर्यावरण दिन.
जमल्यास एखादे झाड लावा आणि स्वतः वर अभिमान करा. मी लग्नाच्या निमित्ताने 100 झाड वाटप करुन पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न केला आहे असे मत नवविवाहीत गोकुळ सपकाळ यांनी व्यक्त केले.