सरकार च्या पेट्रोल, डिझेल, गँस भाववाढ व महागाईचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील भोकरदन सह सात ही तालुक्यात आंदोलने
मधुकर सहाने : भोकरदन
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र(मोदी) सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल इंधनवाड,गँस व महाघाई विरोधात पेट्रोल पंपवर केंद्र सरकारच्या भाववाढीचा निषेध करून आंदोलने करण्यात आली.
याचा भाग म्हणून आज भोकरदन येथील सिल्लोड रोडवरील किरण पी देशमुख (भारत पेट्रोल पंप)वर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी देशमुख म्हणाले की, अगोदरच कोराणा मुळे सर्वांची आर्थिक स्थिती बिघडली असुन त्यामध्ये केंद्र (मोदी)सरकारने देशातील विधानसभा निवडणुका संपताच इंधनवाढ केली असुन जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असुन तरीही देखील केंद्र सरकार इंधनदर वाढ दररोज करीत आहेत यामुळे महागाई सर्वच श्रेत्रात वाढलेली आहे.
वाढलेले इंधनदर केंद्र( मोदी) सरकारने कमी केलेनाही तर आम्ही यापेक्षाही मोठे आंदोलन करु असे राजाभाऊ देशमुख म्हणाले
यावेळी मोदी सरकार मुडदाबाद , पेट्रोल ,डिझेल व गँसचे वाढलेले दर कमी करा नसता खुर्ची खाली करा अशा कार्यकर्ते यांनी घोषणा दिल्या
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सोळुंके,युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, ता अ त्रींबकराव पाबळे, गटनेते संतोष अन्नदाते,विशाल गाडे,श्रावण आक्से,सोपान सपकाळ,रमेश जाधव,रफिक शेठ,शालीकराम गावंडे, विश्वास वाघ,रतण दाभाडे, महेश दसपुते, शेख जुनेद,शेख अस्लम,जुनेद खान, ,दिलीप देशमुख, विष्णू भालेराव, किशोर शिंदे यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.