घनसावंगी तालुका
अखेर ती रुग्णवाहिका राजाटाकळी आरोग्यकेंद्रात दाखल.
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर

घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विभागाकडून मिळालेली रुग्णवाहिका तिर्थपुरी आरोग्य केंद्राकडे पळवल्याची बातमी लावताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 24 तासाच्या आत रुग्णवाहिका परत राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी न्युज जालनाशी बोलताना रोजगार हमी योजनेचे ता अध्यक्ष म्हणाले की, न्युज जालना लाईव्ह च्या मदतीने ही रुग्णवाहिका परत मिळाली असून शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले व याबद्दल आभार मानले.
यावेळी रुग्णवाहिका पोहोच करणाऱ्या चालकाचे रो.ह.यो. ता. अध्यक्ष रविंद्र आर्दड,राजाटाकळी सरपंच प्रतिनिधी डिगाबर आर्दड, उद्धवराव आर्दड,विष्णू आर्दड यांनी स्वागत केले.