जालना जिल्हा
जाफराबाद पोलीस ठाण्यातील दोन फौजदारासह तीन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबितजाफराबाद पोलीस ठाण्यातील दोन फौजदारासह तीन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
जालना : प्रतिनिधी
जाफराबाद येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाची कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी 11 जून रोजी अचानक कार्यालयात घुसून झाडा-झडती घेतली होती ,या संदर्भातील तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोहेकाँ. मंगलसिंग सोळंके, पोकाँ. सचिन तिडके आणि पोकाँ. शाबान तडवी यांचा निलंबित करण्यात आलेल्यामध्ये समावेश आहे.
येवढया मोठ्या प्रमाणात निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.