भोकरदन नगर परिषद च्या नवीन बांधलेल्या गाळ्यात बेकायदेशीर कब्जा केलेल्या व्यापाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरातील नगर परिषद च्या मालकी चे नवीन बांधण्यात आलेल्या गळ्यात अवैध कब्जा करून बसलेल्या व्यापाऱ्यांना तात्काळ खाली करून कारवाई करण्यात यावी या मागणी चे निवेदन भोकरदन शहरातील सामाजिक कार्यकर्ते जुनेद पठाण यांनी नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी पूजा दुधनाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की नगर परिषदने लाखो रुपये खर्च करून व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहे परंतु लिलाव न करता बड्या आणि राजकिय लोकांना कसा काय देण्यात आले आहे याची चौकशी करून संबंधीतावर कार्यवाही करावी व्हावी व अवैध कब्जा धारकाकडून नगर परिषदचे कर दंड स्वरूपात आकरण्यात यावा, तसेच हे गाळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना, लिलावद्वारे देण्यात यावे,या मागणीचे निवेदन आज दि 15 जून रोजी सोमवारी नगर परिषदचे मुख्याधिकारी याना निवेदन देण्यात आले आहे.शेवटी मागणी मंजूर न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.