घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डायरीचे मा.मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते विमोचन

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव येथे पत्रकारांशी साधला संवाद

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

मा.मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे (दि.१५) मंगळवार रोजी कुंभार पिंपळगाव येथे आले असता त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले.कोरोनाची खबरदारी घेत त्यांनी गावातील अनेकांच्या भेटी घेणे टाळल्या मात्र कुंभार पिंपळगाव येथील न्यूज जालनाचे संपादक दिगंबर गुजर यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले की,जाफराबाद येथे पत्रकारांवर झालेल्या पात्रघातक हल्लाचा तीव्र निषेध केला.सदरील घटना निंदणीय व अशोभणीय असून समाजात काळीमा फासणारी घटना घडली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पत्रकार हा लोकशाही चौथा आधारस्तंभ असून पत्रकार हा सर्वसामान्याची समस्या सोडविण्यासाठी रात्रंदिवस झटत असतो.पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कुठल्याही समाज कंटकांनी प्रयत्न करू नये,असे ते म्हणाले. मराठा आरक्षण,पेट्रोल डिझेल दरवाढ,धनगर आरक्षण,वाढलेली महागाई अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डायरीचे विमोचन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर,तालुकाध्यक्ष किशोर शिंदे,राजकुमार वायदळ, कौतिक घुमरे,भागवत बोटे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!