दिवाळी अंक २०२१

पुराच्या पाण्यातून पूल ओलांडणे पडले महागात नागरिकांनी केली होती मनाई,एकाचा मृत्यू,भोकरदन तालुक्यातील घटना

मधुकर सहाने : भोकरदन

images (60)
images (60)

भोकरदन तालुक्यासह परिसरात दमदार पावसाने १६ जून बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हजेरी लावली आहे. या पावसामुळे अवघडराव सावंगी गावालगत असलेल्या नदीला पूर आला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलेले सख्खे चुलत भाऊ शायद सईद सय्यद (१९) आणि सलीम सईद सय्यद (२१) हे दोघे हे नदीवरील पुल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी एकाचा मृत्यु झाला तर एकास वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे.

पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे दोघांना जाण्यासाठी अर्थात पुलावर असतांना तो ओलांडण्यासाठी नागरिकांनी दोघांना मनाईसुध्दा केली होती. मात्र त्यांनी आपण घराकडे जाऊ म्हणून धीर धरून पाणी ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या प्रवाह अधिक असल्याने दोघेही त्यात वाहून गेले. जमलेल्या नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी केवळ सलीम सईद सय्यद याला वाचविण्यात यश आले. तर शायद सईद सय्यद याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!