जालना: बांधकाम कामगारांनी आपले परवाना नूतनीकरण बाबत नियोजन
बांधकाम कामगारांना नुतनीकरणासाठी,पावती व कार्ड वाटप
जालना, दि. 17 – :- महाराष्ट्र इमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, जालना जिल्हयाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे (वेबसाईट) नोंदणी व नुतणीकरणाचे अर्ज मंजुर झालेल्या बांधकाम कामगारांना पावती व कार्ड वाटप करण्याचे काम दि. 22 जुन 2021 रोजीपासुन योजिले आहे. कोविड-१९ रोगाच्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने कार्यालयात गर्दी होऊ नये या अनुषंगाने त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्व बांधकाम कामगारांनी नोंदणी व नुतणीकरण करतेवेळी जे कागदपत्रे ऑनलाईन (वेबसाईट) प्रणालीमध्ये सादर करण्यात आले. त्याच कागदपत्रांची ओरीजिनल कागदपत्रे कार्यालयात येताना सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच कामगाराने कार्यालयात स्वत: हजर राहणे बंधनकारक आहे.
बांधकाम कामगारांना विशेष सुचित करण्यात येते की, मंडळास अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहे मुख्यत्वेकरुन दलालांमार्फत ऑनलाईन नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी मनमानी पध्दतीने शुल्क घेत आहे. तसेच दलालांच्या कोणत्याही भुलथांपाना आपण बळी पडु नये.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahabocw.in) सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तसेच नोंदणी पावतीचे शुल्क फक्त 37 रु. आणि नुतणीकरण पावतीचे शुल्क फक्त 12 रु. एवढे आहे.
पावती व कार्ड मिळविण्यासाठी कामगाराने कोणत्याही प्रकारचे राजकीय, मानसिक, सामाजिक, शारिरिक इ. प्रकारचे दबाव आणण्याचा प्रयत्न कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करु नये. तसे आढळल्यास नियमांनुसार त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.
ज्या कामगारांचे अर्ज मंजुर झालेले आहे व त्या कामगारांनी पावतीचे शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या खात्यामध्ये भरलेले आहे, त्यांनी त्या चलनाची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
कार्यालयात येताना सर्व बांधकाम कामगारांनी कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठीचे सर्व नियम जसे की, तोंडावर मास्क लावणे, सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे, प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 फुट अंतराचे पालन काटेकोरपणे अंमलबजावणी करुन मंडळ व तेथील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
नोंदणी व नुतनीकरण पावती घेण्यासाठी खालील दिलेल्या वार व वेळेनुसार यावे
जालना व बदनापुर तालुक्यासाठी मंगळवार, अंबड व जाफ्राबाद तालुक्यासाठी बुधवार, मंठा व घनसावंगी तालुक्यासाठी गुरुवार, परतुर व भोकरदन तालुक्यासाठी शुक्रवार या सगळ्या तालुक्यांसाठी वेळ 11 ते 3.35 पर्यंत यावे.
बांधकाम कामगारोनी प्रत्यक्ष स्वत: हजर राहणे, बांधकाम कामगारांनी येते वेळेस ऑनलाईन केलेले अर्ज तसेच सर्व ओरिजनल कागदपत्रे आणणे, ऑनलाईन शुल्क भरलेल्या कामगारांनी त्या पावतीची झेरॉक्स घेवुन येणे.