कोरोना अपडेटदिवाळी अंक २०२१

जालना: पिककर्ज पाहिजे, तर हे लागतील कागदपत्रे

खरीप हंगाम 2020-21 साठी पिक कर्ज वाटप सुरु

    जालना दि. 18 (न्यूज जालना) :- खरीप हंगाम 2020-21 करीता जिल्हयामध्ये बँकांतर्फे पिक कर्ज वाटप सुरु आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोविड -19 या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी होणा-या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्हयातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://forms.gle/XQz2RZQcZr7eBSvi8 या संकेतस्थळावरील गुगल लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करण्यात येत आहे. सदरची लिंक jalna.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन  या लिंकव्दारे  नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या यादया जिल्हा अग्रणी बँक, जालना यांचे मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येत आहे. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दुरध्वनी ,लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येत आहे. बँकेमार्फत दुरध्वनी,लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस खालील कागदपत्रासह शाखेत यावे.

images (60)
images (60)

राष्ट्रीयीकृत, व्यापारी ,ग्रामीण बँकेसाठी आवश्यक कागदपत्रे

7/12 -सर्वांसाठी आवश्यक, 8 अ -सर्वांसाठी आवश्यक, फेरफार -नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे) असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधार कार्ड- सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2- सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट (कायदेशीर शोध अहवाल)- रु. 1 लाखापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही. रु. 1 लाखाचेवरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate)- इतर बॅंकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपरवरील स्वयं-घोषणापत्र आवश्यक राहील. बॅंकांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या दि. 28.01.2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी , गहाणखताचे घोषणापत्र (Declaration Mortgage)- रु. 1.60 लाखापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही.  परंतु रू. 1.60 लाखाचे वरील कर्जासाठी दुय्यम निबंधक यांचेकडे नोंदणीकृत असलेले गहाणखताचे घोषणापत्र आवश्यक राहील, स्टॅम्प पेपर- बॅंकेच्या नियमानुसार आवश्यक राहतील.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकरीता आवश्यक कागदपत्रे

   7/12, 8 अ- सर्वांसाठी आवश्यक, इकरार- सर्वांसाठी आवश्यक, फेरफार- नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे) असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधार कार्ड- सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2- सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट (कायदेशीर शोध अहवाल)– रु. 1 लाखापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही. रु. 1 लाखाचे वरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) -इतर बॅंकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपरवरील स्वयं-घोषणापत्र आवश्यक राहील. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या दि. 28.01.2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी, संबंधित वि. का. स. संस्थेचा ठराव आणि कमाल मर्यादा पत्रकात नावाचा समावेश असावा, स्टॅम्प पेपर- बॅंकेच्या नियमानुसार आवश्यक राहतील.

सर्व बँकांनी केवळ वरील प्रमाणे नमुद कागदपत्रे पीक कर्ज मंजूर करते वेळी शेतक-यांकडुन घेण्यात यावीत. इतर अनावश्यक  कागदपत्रांची मागणी बँकांनी करु नये. बँकेने अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास तसेच पीक कर्ज मंजुर करण्यास टाळाटाळ केल्यास शेतक-यांनी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, व्दारा मुख्य शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, जालना व जिल्हा उपनिबंधक, सहकारी  संस्था, जालना येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जालना यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!