जालना जिल्ह्यात उद्यापासून इतका लस साठा उपलब्ध
जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 15 हजार डोस प्राप्त
जालना, दि. 18 (न्यूज जालना) :- जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्ड लसीचे 15 हजार डोसेस प्राप्त झाले असुन यामधुन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांना व शहरी रामनगर व नुतन वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात येणार असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील पहिल्या व दुस-या डोससाठी दिली जाणार आहे. दुस-या डोसचे अंतर 84 दिवसाचे आहे. त्यामुळे कोविन पोर्टप्रमाणे ज्याचा दुसरा डोस 84 दिवसानंतर येईल त्यांनीच लसीकण केंद्रावर यावे.
परदेशी जाणा-या नागरिकांसाठी कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी नुतन वसाहत जालना येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर डोस हा कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कमीत कमी 28 दिवसांचा कालावधी झालेला असल्यानंतरच देण्यात येईल. सदरील डोस घेण्याकरीता पदरेशी नोकरीस्तव व शैक्षणिक कारणास्तव ऑलम्पिक मध्ये भाग घेण्याकरीता जाण्याकरीता इच्छुक नागरीकांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषदजालना येथुन प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
18 ते 44 वयोगटातील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लेवल वर्कर यांचा दुसरा डोस दि. 5 जुन 21 पासुन देण्यात येत असुन त्यासाठी त्यांना लसीकरण केंद्रावर ओळखपत्र दाखवुन जिल्ह्यातील नियोजित सर्व सत्रात लस मिळेल. .
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लस दिली जाणार नाही.
लस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी खालील त्रिसुत्रीचा वापर करावा मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर नियमित वापरावे, हात नियमित धुण्यात यावे.
तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, विवेक खतगावकर यांनी केले आहे