घनसावंगी तालुका

घनसावंगीत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन !

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दि.२० रोजी संकल्प दिन साजरा करून आंदोलन करण्यात आले.

केंद्रात असलेले भाजप सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले असून देशात वाढत वाढलेली महागाई, पेट्रोल इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यात रोष निर्माण होत आहे.भाव कमी करावे अशी मागणी केली.व तीव्र निषेध नोंदविण्यात आला.पेट्रोल डिझेल आणि गस चे भाव वाढवलेले आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.महागाई कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला.यावेळी शोषल मिडीया तालुकाध्यक्ष रघुनाथ ताठे,अ.जा.विभाग युवक अध्यक्ष राहुल शिंदे,कल्याण चिमणे,शेख अली बशीर, अब्दुल कुरेशी,मुरली राठोड, गणेश खरात, श्रीरंग कामठे, राजेंद्र सातपुते, बापुसाहेब कोल्हे,लक्ष्मण खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!