जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 21 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 20 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर ०५, लखमापुरी ०१ मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील आष्टी ०१, परतवाडी ०१,घनसावंगी तालुक्यातील कु. पिंपळगांव ०१, विरेगव्हाण ०१,अंबड तालुक्यातील केसरवाडी ०१, रोहिलागड ०२, शिरनेर ०१बदनापुर तालुक्यातील धामनगांव ०१ जाफ्राबाद तालुक्यातील इंगनिला ०१ भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली ०१, चा. टाकळी ०१, दाभाडी ०१, जामखेडा ०१, जवखेडा ०२ इतर जिल्ह्यातील बुलडाणा ०२, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 24 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.