घनसावंगी तालुका

जालना जिल्ह्यातील हातवन लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २९७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता अठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पाठपुराव्यास यश

images (60)
images (60)

                                      

        जालना दि.23- जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे या प्रकल्पासाठी आवश्यक अशा २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारीत खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

           यामुळे जवळपासच्या १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत दुधना उपखो-यात हातवन गावाजवळील कुंडलिका नदीवर होणार आहे. या योजनेसाठी २००७-८ च्या नियोजनानुसार ५३.३७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.  

         हातवन बृ.ल.पा.प्रकल्प ता. जि. जालना हा प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १५.०३ दलघमी आहे. यातून जालना तालुक्यातील हातवन, हिवरा रोशनगाव, कारला, ममदाबाद, वझर व सोलगव्हाण या ६ गावातील १ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांतर्गत २.१७ दलघमी पिण्यासाठी पाणी राखीव असेल. 

जालना तालुक्यातील सहा गावातील सिंचन क्षेत्र वाढणार असून त्यामुळे कृषी विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री टोपे यांनी सांगितले. ह्या महत्वपूर्ण निर्णयासाठी विभागाचे मंत्री जयंत पाटील यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!