Breaking News
देशविदेश

जन्ना मन्ना जुगार खेळ खेळताना पाच जणांना अटक

सदर बाजार पोलिसांची आपत्ती व्यवस्थापन व जुगार कायद्या अंतर्गत कार्यवाही
जालना न्यूज :
पोलीस स्टेशन सदर बाजार अंतर्गत मोदीखाना येथे काही जुगारी मा जिल्हाधिकारी साहेबांचे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे उल्लंघन करून जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरून सदरची माहिती पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोदीखाना येथे बोळीमध्ये सार्वजनिक ठिकाणी संशयित पाच जणांना ताब्यात घेतले आहे सर्व मोदीखाना येथील रहिवासी आहेत जालना हे कोरोना महामारी संदर्भाने माननीय जिल्हाधिकारी यांचे साथरोग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी एकत्र येऊन गोलाकार बसून चेहऱ्याला मास्क न लावता कोरोना विषाणू, पसरविण्याची हयगयीचे कृत्य करून , जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळताना व कायद्याचा अनादर करताना मिळून आले त्यांचेकडून ३१२० रुपये नगदी व जुगाराचे साहित्य जप्त करून त्यांच्याविरुद्ध पोना शिरसाट यांनी फिर्याद देऊन पुढील तपास पोहेकॅा परशुराम पवार हे करीत आहे सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक एस चैतन्य मा. अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार व उपविभागीय पोलिस अधिकारी , सुधीर खिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार ,कांगणे, शिरसाट पोकॉ दांडगे ,धस महिला पोकॉ रूपाली फुके यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक